रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन

मुंबई: दिनांक 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या दरम्यान संपूर्ण राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे औचित्य साधून श्री नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनी आणि वाहतूक प्रशिक्षण संस्था मुंबई .यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि 8 फेब्रुवारी भायखळा वाहतूक नियंत्रण शाखा या ठिकाणी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरामध्ये टॅक्सी ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर हे देखील सहभागी झाले होते. या रस्ता सुरक्षा अभियान संबंधी बोलताना मुंबईचे ट्राफिक पोलीस उपायुक्त योगेश कुमार गुप्ता यांनी माहिती देत असताना सर्वांचे अभिनंदन केले तसेच रस्त्यावरती प्रवास करत असताना वाहन चालवत असताना आपण घाई करत असतो रस्त्यावरती प्रवास करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे परंतु आपण ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजेत नियम हे सर्वांसाठीच असतात .मुंबई पोलिसांकडून एक सामाजिक भान म्हणून हा एक स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे त्यामुळे या उपक्रमाचे सगळीकडून स्वागत करण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com