पालावा सिटी मध्ये महिला दिना निमित्त स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन

ठाणे : टाऊनहॉल, कासा बेला, पलावा सिटी, डोंबिवली पूर्व येथे. ठाणे शहर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन तर्फे महिला दिन साजरा करण्यात आला, या कार्यक्रमास १५४ महिला उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शुभम मिश्रा यांनी चेन स्नॅचर, किंवा कोणत्याही अज्ञात विकृत प्रवृत्ती पासून आत्मसंरक्षणासाठी अनेक स्वसंरक्षण तंत्रांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सदर सेल्फ डिफेन्स वर्ग श्रीमती वृषाली फर्नांडिस (अध्यक्ष), कॉम्प्लेक्स क्लब समितीच्या प्रमुख श्रीमती लक्ष्मी बिबिश यांनी यशस्वी रित्या आयोजन केले होते, या कार्यशाळे संबधी अधिक माहिती देताना डॉ. शुभम मिश्रा यांनी सांगितले कि मुंबई विभागात अशा प्रकारच्या स्वरक्षण कार्यशाळा बरीच वर्षांपासून होत आहेत. तसेच किक बॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन, महाराष्ट्र चे राज्य अध्यक्ष नीलेश शेलार यांनी आम्हाला या प्रकारचे कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे राबवा हे निर्देश दिले. तसेच प्रशिक्षकांसह संपूर्ण महिला संघाने विनोद रतन पाटील (चेअरमन TCSKA) यांचे आभार मानले जे नेहमीच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य व मदत करतात, त्यांनी वचन दिले आहे की लवकरच आणखी मोठ्या स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन केले जाईल आणि अधिक अधिक प्रशिक्षण दिले जाईल.मानपाडा पोलीस ठाण्यातील प्रमुख पाहुणे एपीआय मनसिहा जोशी यांची हि सादर कार्यक्रमास उपस्थिती लाभली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com