मुंबई : मकर संक्रांत, पोंगल आणि इतर वेगवेगळ्या नावाने हे उत्सव संपूर्ण भारतात साजरे केले जातात. सदर उत्सवांचे नैसर्गिकदृष्टया भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. मकर संक्रातीनिमित्ताने (१५ जानेवारी) हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्यांनी धारावी विभागातील संत कक्कया मार्गावरील श्री धारेश्वर शिव मंदिर येथे येणाऱ्या सुवासिनींना हळदी-कुंकू लावून तिळगुळ देऊन वाण दिला. हिंदू महिलांना जागृत करण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी लव्ह जिहादचा संदेश देणारे फलक लावण्यात आले.
सदर कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मंदिराचे विश्वस्त नितीन कवडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रभाकर शिंदे आणि डेकोरेटर विकी कळंबे यांना शाल, टोपी आणि नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये हिंदू महासभेचे धारावी अध्यक्ष गणेश कदम, प्रमुख कार्यवाह रमेश कराळे, कोषाध्यक्ष प्रशांत केणी, महेंद्र कदम, कुमार कदम आणि महिला प्रमुख निलम कराळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
