मुंबई : अखिल भारत हिंदुमहासभा मुंबई महानगर शाखेच्या वतीने
सोमवार दि. १५/११/२०२१ कार्तिक शु.प.१२ शके १९४३ या दिवशी संध्याकाळी ०७:०० वाजता, मुंबई महानगर शाखेच्या वतीने परळ शाखेत हुतात्मा पंडित नथुराम गोडसे व हुतात्मा नारायण आपटे स्मृतिदिन व पं नथुराम गोडसे यांच्या इच्छा पत्र वाचनाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण व अभिवादन करण्यात आले.
अखिल भारत हिंदुमहासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप केणी व प्रमुख वक्ते आकाशजी भडसावळे यांनी पंडित नथुरामजी गोडसे यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनुप केणी, राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश भोगले व “नथुराम गोडसे जन्मापासून फाशी पर्यंत” या पुस्तकाचे लेखक व प्रमुख वक्ते आकाशजी भडसावळे या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पंडित नथुरामजी गोडसे यांच्या इच्छा पत्राचे वाचन गणेश कदम यांनी केले. दिनेश भोगले यांनी नथुरामजींनी देश हितासाठी हौतात्म्य दिले ते वाया गेले नाही, असे प्रतिपादन केले. तर अनुप केणी यांनी देशात धार्मिक अशांतता निर्माण झाली असताना नथुरामजींसारख्या देशभक्तांची आवश्यकता असल्याचे म्हणाले.
कार्यक्रमाला पदाधिकारी व इतर हिंदुमहासभा कार्यकर्ते मुंबई महानगर कार्यालयीन कार्यवाह दिलीप सावंत , ठाणे जिल्हा अध्यक्ष गोविंद पवार, मुंबई उपाध्यक्ष पांडुरंग पवार, हरिश शेलार, मुंबई सहकार्यवाह गणेश कदम, मुंबई कोषाध्यक्ष अल्काताई साटलेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकरराव खामकर, प्रशांत पळ, आकाश सोनवणे, अक्षय शिंदे, प्रशांत केणी, अशोक पवार, स्वप्नील जागुष्टे, प्रवीण गरजे, सावरकर प्रेमी सतीश भिडे, ऍड.शामबाग आदि उपस्थित होते.