मुंबई : २० ते २४ नोव्हम्बर दरम्यान प्रोफेशनल नेशनल लेव्हल कीक बॉक्सिंग स्पर्धा मिरिख, दार्जीलिंग, पश्चिम बंगाल येथे पार पडल्या यात महाराष्ट्राच्या ओमकार राठोड यांनी चमकदार कामगिरी करत मानाचा नॅशनल किक बॉक्सिंग टायटल बेल्ट मिळविला.
किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र चे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी कर्जत जामखेड चे विद्यमान आमदार रोहित दादा पवार यांची भेट घेतली. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू, इंडियाचा बेस्ट फाइटर ओमकार राठोड तसेच राष्ट्रीय खेळाडू आकाश ओमकारे हे उपस्थित होते. रोहित दादा पवार यांनी ओमकार राठोड याचा नॅशनल किक बॉक्सिंग टायटल बेल्ट विनर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला, तसेच भावी स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या