मुंबई : सन २०२२-२३ या वर्षाकरिता राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, अथलेटिक्स बॉक्सिंग, बॅडमिंटन, शूटींग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस वेटलिफटींग जिस्टिक या खेळासाठी निवासी व अनिवासी प्रबोधनीमध्ये प्रवेश देण्याचे सुचित करण्यात आले होते. सदर प्रशासकीय कारणास्तव संदर्भिय पत्र क्र. २ अनव्ये पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. सबब सदर चाचण्यांचा नवीन कार्यक्रम तपशिल पुढीलप्रमाणे सादर करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
जिल्हास्तरावर खेळाडुंनी जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर यांचेकडे विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज दि. ०९ ते १२ मे २०२२ या कालवधीत [email protected] या ईमेल आयडी व • अर्ज सादर करावे चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडुंनी विहित नमुन्यातील अर्ज (सोबत जोडला आहे) जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे (क्रीडा प्रमाणपत्र / आधारकार्ड (/जन्मदाखला इ) माहितीसह अर्ज सादर करावे.
जिल्हा संकलित झालेल्या अर्जानुसार विभागस्तरीय चाचण्यांचे आयोजन दि. १९ ते २० मे २०२२ वा कालवधी करण्यात येणार आहे. विभागस्तरीय चाचण्याची दिनांक अंतिम झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल. तसेच आधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर श्री. सुमित पाटील ८७९३४४४४ श्री. भाऊराव वीर ८४५९५८५८४१ नमुद क्रमांकाशी संपर्क साधवा