६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ते ३ जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिवसा पर्यंत रात्रशाळा वाचवण्यासाठी आंदोलन आरंभ करत आहोत.
आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेणबत्ती लाऊन त्यांना प्रथम विनम्र अभिवादन केले. आणि दि आंबेडकर एज्युकेशन सोसायटीचे दि मिलिंद नाईट हायस्कूल व ज्यूनियर काॅलेज परळ येथे जाऊन १७ मे २०१७ चा अन्यायकारक काळा GR रद्द करण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनात चंद्रकांत म्हात्रे, राधिका महांकाल, विजय गवांदे, अनिल गवांदे, तिप्पया सर, अजित वाघमारे, ज्ञानेश जोगल आणि आप्पासाहेब कांबळे इत्यादी उपस्थित होते.