‘राष्ट्रीय क्रीडा दिन’

मेजर ध्यानचंद यांची ११३ वी जयंतीहॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज ११३ जयंती आहे. मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलंपिकमध्ये हॉकी खेळात ३ सुवर्ण पदके जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या स्मरणात २९ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो.मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला. विशेषत: बर्लिन ऑलंपिक १९३६ मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाला अंतिमफेरीत ८-१ अशी धूळ चार्ली होती. या विजयासह सलग तीन ऑलंपिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकून अनोखी किमया साधली होती.मेजर ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये ४०० पेक्षा जास्त गोल करत आपण ‘गोल मशीन’ मशीन असल्याचे सिद्ध केले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com