पुणे: वाको इंडिया कॅडेट्स आणि ज्युनियर्स राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा २१ ते २५ डिसेंबर दरम्यान बॉक्सिंग हॉल, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी स्टेडियम, पुणे, महाराष्ट्र येथे होणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये भारतातील विविध राज्यांमधून एक हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेतील प्रतिनिधी, प्रशिक्षक आणि इतर भागधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन चे अध्यक्ष – संतोष अग्रवाल हे राष्ट्रीय स्पर्धेत उपस्थित राहतील. श्री नीलेश शेलार अध्यक्ष, किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र हे संपूर्ण स्पर्धेचे आयोजन वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनच्या व संतोष अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. कोविड-१९ सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या संदर्भात सरकारने जारी केलेल्या कोविड १९ च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वे, सल्ले आणि प्रोटोकॉलचे सर्व सहभागी अनिवार्यपणे पालन करतील. ही स्पर्धा सर्व सहभागीं खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी आणि त्यांची क्षमता ओळखण्यासाठी एक मोठे व्यासपीठ आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही भविष्यातील सर्व कार्यक्रमांसाठी तुमचा मार्ग रणनीती बनविण्याकरिता उपयोगी राहणार आहे. वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन ने भारतभरातील सर्व संबंधित खेळाडू, रेफरी, प्रशिक्षक आणि अधिकारी यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि या चॅम्पियनशिपशी संलग्न होण्यासाठी हार्दिक आमंत्रित केले आहे. पुढील वर्षी आयर्लंडमध्ये होणार्या आगामी वाको वर्ल्ड कॅडेट्स आणि ज्युनियर्स किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवडीचा पहिला टप्पा म्हणूनही ही स्पर्धा महत्वाची मानली जाईल.