मुंबई : वाको इंडिया मुले, कॅडेट्स आणि कनिष्ठ राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप
कोलकाता, पश्चिम बंगाल येथे १९” ते २३ जुलै २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या चॅम्पियनशिपमध्ये भारतातील २६ राज्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. चॅम्पियनशिपमध्ये नम्रता , श्रेयस आणि आदि यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि पॉइंट फाईट आणि लाईट कॉन्टॅक्ट या दोन्ही प्रकारात चमकदार कामगिरी करून पदके जिंकली. द्रोण स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि ठाणे सिटी स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने किक बॉक्सिंगचे अध्यक्ष श्री शुभम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. पदक वितरणाप्रसंगी वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष के अग्रवाल आणि वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी या खेळाडूला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
२०२३ मध्ये प्रशिक्षक शुभम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई इनडोअर गेम्समध्ये खेळण्याची इच्छा खेळाडूंनी व्यक्त केली.