कोकणवासीयांनी जिवापाड जपलेली आपली पारंपारिक लोककला अजूनही शासकीय पटलावर दिसत नाही. त्यादृष्टीने नमन कलेला राजाश्रय प्राप्त करण्यासाठी व कलावंतांना शासकीय मानधन मिळवून देण्यासाठी कोकण नमन कला मंच या सेवाभावी संस्थेची तालुका शाखा स्थापन झालेली आहे.या नोंदणीकृत संस्थेचे १३० नमन मंडळे आजीव सभासद आहेेेत.
नुकतीच या संस्थेच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदयजी सामंत साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन कलावंतांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली व जिल्ह्यातील कलावंतांच्या उज्वल भवितव्यासाठी जिल्हा स्तरीय संघटन बांधनीचा विचार व्यक्त केला. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन जिल्हा संघटन निर्मितीसाठी लागेल ते सहकार्य देण्याचे साहेबांनी मान्य केले. त्याचप्रमाणे राजाश्रय मिळवून देण्याचेही जाहीर केले.
जिल्हा संघटन मजबूत करण्यासाठी तालुकानिहाय सभा घेऊन लवकरच जिल्हा कमिटी स्थापून संपूर्ण जिल्ह्यातील नमन कलावंतांना न्याय मिळवून देण्याचा संस्थेचा मानस अाहे.
तरी या जिल्हा संघटनासाठी प्रत्येक तालुक्यातील कलावंतांनी सहकार्य करावे हि विनंती. संपूर्ण जिल्ह्याची ताकद लावून नमन या लोककलेला एका वेगळ्या उंचीवर नेऊया.
संपर्क –
श्री. श्रीधर खापरे 8446856706
श्री.प्रभाकर कांबळे 9860178185
श्री.अरूण कळंबटे 8262816320
श्री.हरिश्चंद्र बंडबे 8605968619
श्री.श्रीकांत बोंबलॆ 7709345424