गोवा : दयानंद बांदोडकर क्रीडा संकुल, पेडणे, गोवा येथे वाको इंडिया नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१ सिनियर अँड मास्टर्स दिनांक २६ ते २९ पार पडली. स्पर्धेत संपूर्ण भारतातील २३ राज्यांचा सहभाग होता. मुंबई शहर तर्फे महाराष्ट्राचे नेतृत्व करताना क्रिएटिव्ह फॉर्म या इव्हेंट मध्ये विघ्नेश मुरकर याला रौप्य पदक व तर पॉइंट फाईट मध्ये भूपेश वैती याने कांस्य पदक मिळवत स्पर्धेत दोघांनी आपली छाप पाडली. स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर, तर्फे सदर स्पर्धेत रोशन शेट्टी, लॉबिंग जेम्स, राहुल साळुंखे हे खेळाडू व सोबत प्रशिक्षक उमेश मुरकर यांनी सहभाग नोंदविला. शितो रियू स्पोर्ट्स अँड किकबॉक्सइंग असोसिएशन आणि गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्ट यांनी या मुलांना प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून दिले होते. विघ्नेश व भूपेशच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाको इंडिया चे अध्यक्ष संतोष अगरवाल व वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी विजेत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
