मुंबई उपनगर संघाने महाराष्ट्राचे यशात उचलला सिंहाचा वाटा, राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा

पुणे : मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशन, उपनगर संघाने छत्रपती शिवाजी महाराज संकुल, बालेवाडी, पुणे, महाराष्ट्र येथे २१ ते २५ डिसेंबर २०२१ दरम्यान राष्ट्रीय कॅडेट आणि ज्युनियर चॅम्पियनशिप २०२१मध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतला. १३ सहभागी ७ एकेरी प्रकारात व ६ दुहेरी प्रकारात संस्थेच्या छोट्या फायटरांनी एकूण १४ पदकांची कमाई केली होती, ९ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य जिंकले होते, मुंबई उपनगर चे अध्यक्ष श्री विशाल सिंग व सचिव प्रशांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर संघांनी नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्राच्या यशात मोठा वाटा उचलला व महाराष्ट्र संघाला पहिले स्थान मिळविण्यास आपले योगदान दिले.
प्रगती पांडे हिच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे तिने दुहेरी सुवर्ण विजय मिळविला
सुवर्ण पदक विजेते – हृषित शेट्टी, जॉर्डन जॉन्सन, प्रगती पांडे, रिद्धिमा दास, सिद्धांत पांडे,विकास प्रजापती, पियुष गुप्ता, संकल्प गवळी,

रौप्य पदक विजेते – ध्रुवेश पायौला, रिधिमा दास, कांस्यपदक विजेते – जॉर्डन जॉन्सन, पुनारसिंग डिलन, सिद्धांत पांडे
सहभागी स्पर्धक -अनय तिवारी, कार्तिक नार्वेकर, किमिक्षा सिंग

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com