राज्य स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्याने ६ सुवर्णपदक पटकावत चमकदार कामगिरी केली

मुंबई : ऑल महाराष्ट्र राज्य कॅडेट आणि ज्युनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२, किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच बंधन लॉन -अहमदनगर येथे पार पडली. सदर संस्थेचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी राज्य स्पर्धेचे आयोजन केले होते.
मुंबई किक बॉक्सिंग असोसिएशन संस्थेच्या किमिक्षा सिंह हिने दुहेरी सुवर्ण पटकावत स्पर्धेवर आपली छाप सोडली. मुंबई उपनगर शहरातील किक बॉक्सर खेळाडूंनी आपली चमक दाखवत ६ सुवर्ण पदके, ५ रौप्य पदके व ६ कांस्य पदके अशी एकूण १७ पदके पटकावत चमकदार कामगिरी केली. मुंबई किक बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष – विशाल सिंह यांनी उपनगर जिल्हातील मुलांना मार्गदर्शन केले. सदर स्पर्धेस महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांनी सहभाग नोंदवत एकूण १४६० मुले व मुलींनी उपस्थिती नोंदविली.
सुवर्ण पदक : किमिक्षा सिंह – दुहेरी सुवर्ण, पार्श्व संघवी, अर्णव शर्मा, हर्ष सालेकर, अनुराग द्विवेदी

रौप्य पदक : साक्षी लोखंडे – दुहरी रौप्य, रिद्धी अकुल, पार्श्व संघवी, अर्णव शर्मा,

कांस्य पदक : बिशाखा सिंह, आफ्रा पठाण, दुआ सय्यद, अवनीश शर्मा, साई सालेकर, श्लोक आयरे,

सहभाग : दिशिका दास, श्वेता सिंह, कृतिका शेट्टी, आरव पवार, मेहेरवान कोहली, आरव गुप्ता, अमन गुप्ता, गौरान अखाड़े, नील धरणे, शिवांश साळुंके, ध्रुवेश पायौला, मयंक कारेकर, स्वर्ग काबरा

प्रशिक्षक – अश्विन सिंग, ओंकार मोहिते, सूरज राजभर, अंकुर देव
रेफ्री – विशाल सिंग, मुक्ती परिता गोस्वामी हे मान्यवर स्पर्धेत सहभागी होते

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com