मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनिअर किक बॉक्सिंग स्पर्धा २०२२ संपन्न

मुंबई : दिनांक १० मे २०२२ रोजी मुंबई किक बॉक्सिंग असोसिएशन तर्फे मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनिअर किक बॉक्सिंग स्पर्धा २०२२ यशस्वी रित्या पार पाडण्यात आली. ही स्पर्धा बृहन्मंबई महानगर पालिका गुंदवली शाळा संकुल, नटराज स्टुडिओ जवळ, गुंदवली, अंधेरी (पूर्व)-४०००६९ या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष – विशाल सिंग यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी विविध प्रकारात सहभाग घेतला. स्पर्धेस अतिथी म्हणून मुंबई शहर अध्यक्ष उमेश मुरकर ( स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असो. मुंबई शहर) आणि इंडो कराटे अँड स्पोर्ट्स फेडरेशनचे संचालक अनिता प्रदीप मोहिते हजर होत्या. या जिल्हास्तरीय स्पर्धेस आलेल्या संघांचे अध्यक्ष विशाल सिंह यांनी स्वागत केले. विजेते स्पर्धक येत्या १५ ते १७ मे २०२२ रोजी नगर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत खेळणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com