मुंबई महापौर चषक किक बॉक्सिंग स्पर्धा जल्लोषात संपन्न

मुंबई : शहाजी राजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशन, उपनगर द्वारे आयोजीत मुंबई महापौर चषक किक बॉक्सिंग स्पर्धा-२०२१-२२ आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा आयोजक अध्यक्ष- विशाल सिंह, सचिव- प्रशांत कांबळे व खजिनदार- नितेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस श्री. हेमराज सिंग राजपूत, उमेश ग. मुरकर अध्यक्ष- स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर व संपूर्ण आयोजक समिती यांच्या हस्ते पार पडला. या किकबॉक्सिंग स्पर्धे मध्ये तबल ३५ हुन अधिक संघांनी भाग घेतला आणि ५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. या स्पर्धांचे ज्युनियर डिव्हिजनचे प्रथम क्रमांक पारितोषिक शितो रियू स्पोर्ट्स करते अँड किकबॉक्सिंगअसो. (एस.एस.के.के.ए.) संघाने प्रशिक्षक उमेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पटकावली. तसेच द्वितीय क्रमांक चिता मार्शल आर्ट टीम व तृतीय विजेता निर्भया इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट्स हे ठरले. तसेच सिनिअर डिव्हिजन मध्ये प्रथम योद्धा अँड आय.के.एस.एफ. मुंबई पोलिस संघ ग्रँड मास्टर प्रदीप मोहिते सर यांनी पटकावले तर द्वितीय क्रमांक ट्रेन विथ गणेश या संघ गणेश यादव यांनी पटकावले आणि तृतीय क्रमांक फायटर्स कॉम्बॅट क्लब टीम दीपक पाटील यांनी मान मिळवला.

ही स्पर्धा पार पाडण्याकरिता वाको महाराष्ट्र अध्यक्ष- निलेश शेलार व सचिव- धीरज वाघमारे तसेच पोलीस निरीक्षक ग्रँड मास्टर.प्रदीप महादेव मोहिते, हानशी. अनिता प्रदीप मोहिते, हानशी. सुनील सोनवणे सर, उमेश मूरकर सर, शुभम मिश्रा, सूर्यप्रकाश मुंडपात, आशिष रणे, जयेश चौगुले सुवेश शर्मा यांचे वाको मुंबई संघाने यांचे स्वागत केले व केलेल्या सहकार्यासाठी धन्यवाद दिले. स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून किक बॉक्सिंग विश्वविजेता व सेलिब्रिटी ट्रेनर द्रीव नील, बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन या नामांकित व्यक्तिमत्त्वांनी आपली हजेरी लावली

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com