मुंबई :आग लागण्याची शक्यता कुठेही नाकारता येत नाहीच, विशेषतः अशा सार्वजनिक ठिकाणी जिथे फायर सेफ्टी ऑडिट झालेलं नसतं. पण अचानक आग लागली तर त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा? यासाठी श्री. हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती व धारावी अग्निशामक केंद्र (बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील नागरिकांसाठी श्री हनुमान सेवा मंडळाच्या आवारात आग विझविण्याच्या कवायती व आग न लागण्याकरिता घेण्यात येणारी खबरदारीचे मार्गदर्शन मुंबई अग्निशमन अधिकारी श्री सावंत, श्री. महाजन व यांचे सहकारी यांनी उपस्थित नागरिक महिला, पुरुष व कार्यकर्ते यांना प्रत्यक्षितासहित मार्गदर्शन केले.