मुंबई शहर जिल्हास्तरीय वरिष्ठ किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न
मुंबईचे सर्वोत्तम फायटर जिल्हा-स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत विजयी
मुंबई: हनुमान सेवा मंडळ हॉल, धारावी येथे ३ री मुंबई शहर जिल्हास्तरीय वरिष्ठ किक बॉक्सिंग स्पर्धा २०२३ दि. १९ मे रोजी यशस्वीरीत्या पार पडली. ही स्पर्धा स्पोर्टस किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर यांच्या द्वारे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धे मध्ये एकुण किक बॉक्सिंग च्या सहा प्रकारात खेळाडुनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे प्रवेश अर्ज जिल्हा संघटनेच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या. मुंबई शहर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश ग मुरकर यांनी खेळाडूंना राज्य किक बॉक्सिंग स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा देताना खेळ खेळाकडे लक्ष केंद्रित करण्याचा मोलाचा सल्ला दिला. स्पोर्टस किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या जिल्हा संघटनेच्या माध्यमातून व गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या सहकार्यानि मुंबई शहरात या खेळा संबंधित विवध उपक्रम तसंच प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येत आहेत याची माहिती दिली. विजेते स्पर्धक येत्या ४व ५ जून २०२३ रोजी नगर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ किकबॉक्सिंग स्पर्धेत खेळणार आहेत.
सुवर्ण पदक विजेते स्पर्धक : मुली – अश्विनी जांबळे, प्राप्ती रेडकर, सोमिल सावला, विनी साल्दान्हा, रसिका मोरे, नम्रता जोशी, सुवर्ण पदक मुले – विन्स पाटील, समर्थ सावंत, विघ्नेश मुरकर, आशिष महाडिक, अरमान चंद्रशेखर, विवेक मौर्य , भूपेश वैती, साहिल बापेरकर, वेदांत केंगार, आशिष ठाकूर, क्रिश मेहता, प्रविण ढगे, अक्षय ठाकूर, प्रशांत कुमार झा, क्रिश मेहता, अक्षय ठाकूर, आशिष ठाकूर, माउली रेड्डी

