मुंबई : भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल धारावी मुंबई १७ येथे दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ रोजी १ली मुंबई शहर जिल्हास्तरीय ज्युनिअर अँड कॅडेट किकबॉक्सिंग स्पर्धा – २०२१ यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही स्पर्धा किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर यांच्या द्वारा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धे मध्ये एकुण किक बॉक्सिंग च्या सहा प्रकारात १०५ खेळाडुनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे प्रवेश आर्ज जिल्हा संघटनेच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या. स्पर्धेत रेफरी म्हणून राहुल साळुंखे, महेश जाधव, विघ्नेश मुरकर, रोशन शेट्टी, महेंद्र राज, श्राव्या शेट्टी, अनुप्रिता घाग, ओम साळवी, विजय पडीयाची, भूपेश वैती यांनी काम पाहिले, मुंबई शहर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष – उमेश ग. मुरकर यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना, खेळाडूंना खेळाकडे लक्ष केंद्रित करण्याचा मोलाचा सल्ला दिला. येणाऱ्या काळात स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या जिल्हा संघटनेच्या माध्यमातून व गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने मुंबई शहरात या खेळा संबंधित विवध उपक्रम तसेच प्रशिक्षण वर्ग राबविण्याचा मानस व्यक्त केला. तसेच सर्व विजयी खेळाडूना मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. व त्यांची येत्या २९ ते ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी नगर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धे करीता निवड करण्यात आली
.

