विजेते स्पर्धक नगर येथे होणाऱ्या राज्यस्तर स्पर्धेत खेळणार.
मुंबई : हनुमान सेवा मंडळ हॉल, धारावी मुंबई १७ येथे २ री मुंबई शहर जिल्हास्तरीय ज्युनिअर अँड कॅडेट किकबॉक्सिंग स्पर्धा – २०२२ यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही स्पर्धा किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर यांच्या द्वारा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धे मध्ये एकुण किक बॉक्सिंग च्या सहा प्रकारात खेळाडुनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे प्रवेश आर्ज जिल्हा संघटनेच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या. स्पर्धेत रेफरी म्हणून अनुप्रिता घाग, विघ्नेश मुरकर, भूपेश वैती, यशराज शर्मा यांनी काम पाहिले, मुंबई शहर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष – उमेश ग. मुरकर यांनी खेळाडूंना राज्य किक बॉक्सिंग स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा देताना, खेळाडूंना खेळाकडे लक्ष केंद्रित करण्याचा मोलाचा सल्ला दिला. येणाऱ्या काळात स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या जिल्हा संघटनेच्या माध्यमातून व गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने मुंबई शहरात या खेळा संबंधित विवध उपक्रम तसेच प्रशिक्षण वर्ग राबविण्याचा मानस व्यक्त केला. विजेते स्पर्धक येत्या १५ ते १७ मे २०२२ रोजी नगर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत खेळणार आहेत. सदर स्पर्धेत विशाल सिंग, रहित भंडारी व राहुल साळुंखे या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच पंच म्हणून काम करताना सानिकेत साळसकर, विघ्नेश मुरकर, यशराज शर्मा, अनुप्रिता घाग, भूपेश वैती, आफताब खान यांनी स्पर्धेत मोलाचा वाट उचलला
सुवर्ण पदक विजेते , ईशा हेमंत चोरगे, हिंदवी बांदीवडेकर, रुकैया नीमचवालाध्रुव अमर पालव, दर्श विवेक म्हसकर, रियान सावंत, सावीर राजेश पालये, अली असगर एच सुटेरवाला, सोम महेश चव्हाण, बुरहानुद्दीन काचवाला, दाऊद एफ वागलावाला, दाऊद एफ वागलावाला, प्रीशा पिल्लई, सारा रंगवाला, सर्वेश राणे, आलोक ब्रिदअनिकेत जैस्वार, अमातुल्ला एफ वागलावाला, बुरहानुद्दीन मुर्तझा रंगवाला, अमातुल्ला एफ वागलावाला, सय्यद मोहम्मद अफान, हातिम एच सुटेरवाला, आशिष महाडिक, समर्थ सावंत, विन्स पाटील,
अभिनंदन, व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा