मुंबई: चिल्ड्रेन नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२, बि एस एफ कॅम्प, राजधाबारी, सीलिगुडी, वेस्ट बंगाल येथे पश्चिम बंगाल स्पोर्टस किकबॉक्सिंग असोसिएशन संलग्न: वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन व युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, सरकार यांच्या द्वारे मान्यताप्राप्त स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबई शहर मधून बुरहानुद्दीन मुर्तझा रंगवाला याने किक-लाइट या प्रकारात सुवर्णपदक तर पॉइंट फाईट प्रकारात रौप्य पदक पटकावले यास प्रशिक्षक- रोहित भंडारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर उपनगराच्या रिद्धी महेश अकुल हिने लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात सुवर्ण पदक तर पॉइंट फाईट प्रकारात रौप्य पदक पटकावले हिला प्रशिक्षक-राजेश मालवीय यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असो. मुंबई शहर चे अध्यक्ष उमेश मुरकर व मुंबई किकबॉक्सिंग असो. उपनगर चे अध्यक्ष विशाल सिंह यांनी विजेत्यांना व त्यांच्या प्रशिक्षकांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व भविष्यात असेच मुंबई सोबतच महाराष्ट्राचे व भारताचे नाव उज्वल कराल असे नमूद केले.
