मुंबई : नवी दिल्ली येथे व्हायब्रंट कॉन्सेप्ट्सने आयोजित केलेली भारतातील सर्वात प्रख्यात स्पर्धा “मिसेस इंडिया गॅलेक्सी २०२१” मध्ये मुंबईतल्या शिवडी पोलीस लाईन रे रोड दारुखाना येथे रहाणार्या रहीवाशी सौ. उर्मिला संतोष कदम यांनी नुकत्याच पार पडलेल्या “मिसेस् इंडिया गॅलेक्सी २०२१” या स्पर्धेत त्यांच्या सादरीकरणावर “मिसेस् इंडिया गॅलेक्सी मोस्ट टेलेंटेड” चा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे.
सदर स्पर्धेचे आयोजन दिग्दर्शिका गिन्नी कपूर आणि गगनदीप कपूर यांनी केले होते. हे दोघेही दीर्घ काळापासून महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करत आहेत. मिसेस इंडिया गॅलेक्सीच्या मुख्य मेंटॉर गिन्नी कपूर यांचा विश्वास आहे की, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास हे आनंदी आणि प्रेरणादायी जीवनाचे सर्वात आवश्यक घटक आहेत.
मिसेस इंडिया गॅलेक्सी विवाहित भारतीय महिलांना वय, वजन किंवा उंचीचे सामाजिक नियम मोडून व्यावसायिक मॉडेल म्हणून रॅम्पवर चालण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी देते. भारतातील विविध भागांतील महिलांनी त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आणि महिलांवरील हिंसाचार थांबवण्याच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या आहेत.
व्यक्तिमत्व वृद्धिंगत करण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि व्यावसायिक मॉडेल म्हणून करिअर करण्यासाठी विविध पैलूंवर प्रशिक्षण देण्यासाठी गेल्या ३ महिन्यांत ग्रूमिंग आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा समारोपाच्या अंतिम सोहळ्यात परीक्षक म्हणून गगन वर्मा – मिस्टर सुपर मॉडेल युनिव्हर्स २०१६, अभिनेत्री आणि मॉडेल अमिता पांडा – मिसेस युनिव्हर्स २०१९, शंकर साहनी – बॉलिवूड गायक, पूर्वा राणावत – आंतरराष्ट्रीय योग तज्ञ आणि मॉडेल हे सहभागी होते.