जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई-शहर येथे श्री अरुण जितेकार- (क्रीडा अधिकारी) यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई-शहर मार्फत श्री अरुण बालाजी जितेकर (क्रीडा अधिकारी) यांचा दि. ३० जून २०२१ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणिय संजय महाडिक साहेब, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग मुंबई, जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे साहेब, तालुका क्रीडा अधिकारी – अभय चव्हाण साहेब, उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई बाजीराव देसाई- क्रीडा अधिकारी, मुंबई-शहर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सुमित पाटिल – राज्य क्रीडा मार्गदर्शक, श्रीमती भारती देविकर (वरिष्ठ लिपीक) ओम लोटलीकर-(लिपीक) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

श्री. अरुण जितेकर हे उत्कृष्ठ खेळाडू होते. पूर्वी क्रीडा संचालनालया मार्फत NSTC टेस्ट प्रमाणे टेस्ट घेत असत त्या टेस्ट मध्ये शाळेय जिवणात ५ स्टार प्रमाणपत्र प्राप्त खेळाडू होते. A.S.C. कॉलेज पनवेलचे ते सलग चार वर्षे ॲथलेटिक्स जनरल चॅम्पियन होते, स्काऊट गाईड मास्टर होते. त्याच प्रमाणे NCC. मध्ये ‘C’ सर्टिफीकेट पास होते. मुंबई विद्यापिठाच्या NCC कॅम्प मधील क्रॉसकंट्री मध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला होता. कॉलेज चे संघ विद्यापिठात सहभागी व्हायचे त्यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल चे संघ सहभाग ध्यायचे त्या संघाचे कॅप्टन असायचे, मुंबई विद्यापिठात भाला फेक मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. A.SC. कॉलेजने त्यांना ”राणा प्रतापची” उपाधी देऊन गौरविण्यात आले होते. जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत जलतरण, रनिंग, जंम्पींग, त्याच प्रमाणे कबड्डी, खो-खो, व्हॉलिबाल या खेळांचे त्यांनी पदक प्राप्त केलेले असून विभागीय शाळेय स्पर्धांमध्ये पुणे विभागात त्यावेळी लांब उडी, ट्रिपल जंप मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केले असून १००m रनिंग रिळे, ४०० मी. रनिंग रिले मध्ये सहभागी होऊन संपादन केले आहे.
सुरवाती पासुनच खेळाची आवड असल्यामुळे ते क्रीडा विभागाकडे वळले. त्यांची पहिली नियुक्ती त्यांच्याच जिल्हयात दि. १/६/१९९६ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड येथे झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल रायगड येथून त्यांची बदली मुंबई शहर येथे झाली. मुंबई शहर येथून बदली जि.क्री.. ठाणे येथे झाली. ठाणे येथून बदली जिक्री.अ. रत्नागिरी व रत्नागिरी येथून बदली जि. क्री, अ. मुंबई शहर येथे झाली. या सर्व ठिकाणी काम करत असताना त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामा सोबत एकनिष्ठ राहून त्यांनी मुंबई विभागाची प्रामाणिकपणे सेवा केली,
सेवा निवृत्ती समारंभात अरुण जितेकर भाऊक झाले होते. २५ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेत क्रीडा अधिकारी या कामानिमित्त अनेक जिल्हयात भ्रमंती होऊन या कालावधीमध्ये अनेक मित्र होऊन त्यांची वेगवेगळ्या प्रकारची मदत झाली. सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नाही, पण या सर्व कार्यालयामध्ये काम करत असताना तिथले. अधिकारी, कर्मचारी, त्याच प्रमाणे क्रीडा शिक्षक, खेळ संघटनांचे पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. मी सर्वाचा ऋणी राहिन, त्या सर्वांचे प्रेम मिळणारा मी अतिशय नशिबवान क्रीडा अधिकारी स्वतःला समजतो. आपल्या सर्वाच्या सहकार्या मुळेच आज मी या ठिकाणी सलग २५ वर्षे एकनिष्ठ व प्रामाणिक सेवा करुण दि.३०/६/२०२१ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई- शहर येथून यशस्वी सेवा निवृत्त होत आहे.
अरुण जितेकर – क्रीडा अधिकारी मुंबई- शहर यांनी आजपर्यन्त केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनिय आहे. त्यांचे शब्दात वर्णन होणे अशक्य आहे. त्यांना पुढील आयुष्य निरोगी व सुखसमृद्धीचे व आनंदाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
पत्रकार – उमेश ग. मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com