मुंबई : माननीय आमदार प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी MCGM DMC श्री रमाकांत बिरादार सर आणि वॉर्ड ऑफिसर जी-उत्तर श्री प्रशांत सपकाळे जी आणि विविध विभागाच्या संपूर्ण टीमसोबत एक संयुक्त बैठक बोलावली होती.. धारावीत रस्त्यावर जमा होणारा कचरा, रास्ता खोदकाम मुक्त करणे, रस्त्यांची कामे लवकरात लवकर संपविणे, काही ठिकाणी टॉयलेट संबधी प्रश्न होते तेही मार्गी लावण्याचे निर्देश दिले, सायन स्टेशन जवळील घरगुती नळाच्या पाईप लाईन खंडित करण्यात आल्या आहेत , संबंधित नागरिकांनी गेले सात महिने वेळो वेळी अर्ज करून सुद्धा हा प्रश्न म न पा कडून सोडविण्यात आला नाही, त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी उमेश मुरकर यांनी अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले, पुढील १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लावला जाईल हे आश्वासन मिळाले, धारावीच्या विविध समस्यांना प्राधान्याने सोडवण्याची सूचना यावेळी आमदार वर्षा ताई यांनी केली.