श्री हनुमान सेवा मंडळच्या हॉल मध्ये मध्ये मेडिकल हेल्थ चेकअप व लसीकरण रजिस्ट्रेशन कॅम्प संपन्न.

मुंबई : श्री हनुमान सेवा मंडळ व भारतीय जैन महासंघ यांच्या वतीने काळा किल्ला, धारावी विभागातील नागरिकांसाठी हनुमान जयंती उत्सवा निमित्ताने मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प व कोविड लसीकरण रजिस्ट्रेशन कॅम्प दिनांक २७/०४/२०२१ रोजी सकाळी १०.०० ते दु. ४.०० वा. हनुमान मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले होते, श्री हनुमान सेवा मंडळ हे नेहमीच सामाजिक बांधिलकी ची जाण ठेऊन असे लोकहिताचे कार्यक्रम राबवात असतात. या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना आरोग्य तपासणी सोबत मोफत औषधे देखील दिले आहे. या कामी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून या कार्यक्रमाबद्दल जनजागृती केली.
श्री हनुमान सेवा मंडळ मधील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले, तसेच कोरोना काळात स्थानिक मंडळींना चांगले मार्गदर्शन करा कोरोना विषयी जनजागृती करून लोकांच्या मनातील भिती दूर करा असा मोलाचा सल्ला देखील दिला. सदर आरोग्य तपासणी कामी डॉ. आकांक्षा मिश्रा, डॉ. सुफियान अन्सारी, सह स्वयंसेवक- गौरी जाधव, माधुरी रबाडे, सलमा शेख यांनी मोलाचे सहकार्य केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com