गोवा : म्हापसा येथे मल्टिपर्पज इनडोअर स्टेडियम दयानंद बांदोडकर क्रीडा संकुल, म्हापसा गोवा येथे पार पडलेल्या
वाको इंडिया सीनिअर अँड मास्टर नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी
प्रशंसनीय कामगिरी करत ३० सुवर्ण पदक. १२ रौप्य पदक व २४ कांस्य पदका सहित प्रथम क्रमांकाचा चषक मिळविला. किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी व असोसिएशनच्या सहकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल व सहकार्याबद्दल धन्यवाद देत, खेळाडूंना अशीच वाटचाल कायम राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे नमूद केले. या प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव – धीरज वाघमारे यांनी सांगितले की किक बॉक्सिंग या खेळात महाराष्ट्राने उत्तम योगदान देत नेहमी प्रमाणे याही वर्षी प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल आनंद व्यक्त केला. सदर स्पर्धेत महारष्ट्र संघ टीम व्यवस्थापक या भूमिकेत रुपेश परदेशी, श्रीकांत पूजारी यांनी टीम कोच व शीतल राणे यांनी महिला टीम कोच ची भूमिका अगदी योग्य रित्या पार पडली.
वाको इंडिया किक बॉक्सिंग नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांनी सर्व पंच व खेळाडूंना भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी उमेश मुरकर