महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग स्पर्धेत ठाणे सिटी ला तीन सुवर्ण पदकेनम्रता, श्रेयस व आदी यांची उत्कृष्ठ कामगिरी

मुंबई : बंधन लोन, अहमद नगर येथे संपन्न झालेल्या कॅरेट अँड ज्युनियर किक बॉक्सिंग राज्य स्पर्धेत ठाणे सिटी मधून खेळताना नम्रता गुप्ता, श्रेयस झा व आदी पिसोलकर या खेळाडूंनी सुवर्ण पदके पटकावत स्पर्धेत आपली वेगळी छाप पाडली. या राज्य स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या विविध २६ जिल्ह्यातून एकूण १३३० मुले सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेता राहुल कुलकर्णी होते आणि अहमदनगर माजी पालक मंत्री शिंदे यांच्या हस्ते स्पर्धे चे उदघाटन करण्यात आले व त्यांनी खेळाडून चे मनोबल व उत्साह वाढवला. या मध्ये ठाणे जिल्हा चा देखील समावेश होता द्रोणा स्पोर्टस् अकॅडमी यांच्या ८ खेळाडूंनी यात सहभाग घेतला व उत्कृष्ठ कामगिरी दाखवत यश संपादन केले विजयी खेळाडूंची नावे सुवर्ण पदक- नम्रता गुप्ता, श्रेयस झा, आदी पिसोलकर रोप्य पदक – स्वर्णगी थळनेरकर. कांस्य पदक – मिष्टी शर्मा, अभिवेद श्रीकुमार, निवेदया, सहभाग – सिद्धार्थ गुप्ता. सदर खेळाडू व अकॅडमी चे सर्व पालक यांचे आमदार राजू पाटील व विनोद पाटील (ठाणे सिटी चेअरमन) यांनी कवतुक करत म्हणाले की खूप उत्कृष्ठ काम संपूर्ण ठाणे ग्रामीण जिल्हात करत आहेत़ व ठाणे शहर संघाने उत्कृष्ट कामगिरी केली यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या व खेळाडूंचे मनोबल वाढवले. द्रोना स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक मनोहर पाटील ने सर्व खेळाडूचे मनोबल वाढवले आणि त्यांना राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करा अस सांगितले. कासा बेल्ला गोल्ड चे चैरमन श्री योगेश पाटील यांनीही मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . प्रमुख मार्गदर्शक व ठाणे सिटी चे प्रेसिडेंट डॉ शुभम मिश्रा सर यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली मुलांनी उत्कृष्ठ कामगिती दाखवत दणदणीत यश संपन्न केले. विजयी खेळाडूंचे ठाणे शहरात सर्वत्र कवतुक होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com