मुंबई : विरार कोरोनाच्या काळात अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांना जीवन जगणे असह्य झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना एक मदतीचा हात इतर आमदारांनी देखील यातून प्रेरणा घ्यावी असा उपक्रम श्री भरत शेठ गोगावले यांनी सध्या राबविला आहे. आपल्या मतदार संघात ज्यांची कुटुंबे मुंबईमध्ये व उपनगरात उदरनिर्वाहासाठी आहेत अशा कुटुंबांना देखील गावावरून मुंबईसारख्या शहरात वरळी, अंधेरी, गोरेगाव नालासोपारा ,विरार ज्या ज्या भागांमध्ये मतदारांची कुटुंब व नातेवाईक रहात आहेत अशांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाला अनेक स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओवले ग्रामविकास मंडळ मुंबई पदाधिकारी यांच्या वतीने त्याचे आभार व्यक्त करण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंचे वाटप स्वीकारताना श्री.संतोष पौळेकर, श्री.सचिन जागडे, श्री.अतुल पवार, श्री.महेंद्र धाडवे,श्री. रामदास आतकोले,श्री.सतीश पौळेकर, श्री.प्रदीप जागडे, श्री.एकनाथ आंग्रे, श्री.राज भावे,श्री.सत्यवान आतकोले, श्री.सिद्धेश धाडवे,श्री.रुपेश निंबरे, श्रीमती मनीषा पौळेकर , सौ. निलिमा सोलकर (भावे)
श्री.अनंत सोलकर (का.संपादक पंचनामा न्यूज)