अधिकृत राज्य क्रीडा संघटनांची माहिती विहित नमुन्यात सादर करण्याबाबत महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांना पत्र

मुंबई (प्रतिनिधी ) क्रीडा व युवक सेवा संचनालय आयुक्त सुहास दिवसे यांनी ६ वादग्रस्त खेळांच्या अधिकृत राज्य क्रीडा संघटनांची माहिती विहित नमुन्यात सादर करण्याबाबत महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांना पत्र पाठवून माहिती मागविली होती. मात्र, ‘एमओए’ सचिवांनी माहिती देणे टाळून काही खेळ संघटनांच्या बाबतीत अपुरी व चुकीची माहिती दिली आहे. सहा खेळ संघटना मधील वादामुळे क्रीडा व युवक सेवा संचनालय आयुक्तांनी महासचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांना ८ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर व ९ डिसेंबर रोजी, असे तीन पत्र पाठवलेली आहेत. यामध्ये बास्केटबॉल, व्हालीबॉल, कयाकिंग, कनोईग, तायक्वांदो, कराटे व किकबॉक्सिंग खेळांच्या संघटनांची माहिती मागविण्यात आलेली होती.

यासंदर्भात या संदर्भात आंतरराष्ट्रीय रेफेरी तसेच भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे २०१३ ते २०१८ साला पर्यंत महाराष्ट्र शासनातर्फे किक बॉक्सिंग या खेळाकरिता प्रशिक्षक असलेले व स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश मुरकर यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की किक बॉक्सिंग खेळा मधून संकुलात प्रशिक्षण देताना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत, दुर्दैवाने शासना कडून सदर क्रीडा संकुलाचे खाजगीकरण झाल्याकारना मुळे या खेळाचे सुरु असलेले प्रशिक्षण खंडित करण्याची वेळ आली… असो. किक बॉक्सिंग या संदर्भात सांगायचे झाल्यास जी राष्ट्रीय संघटना जागतिक संघटनेशी संलग्न आहे तीच राष्ट्रीय संघटना अधिकृत समजली जाते व अशा राष्ट्रीय संघटनेची राज्य संघटनेला मान्यता असेल तर ती अधिकृत संघटना समजली जाते. वाको इंडिया किकबॉक्सिंग महासंघ हा वर्ल्ड असोसिएशन ऑफ किकबॉक्सिंग ऑर्गनायझेशन्स (WAKO) ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) मान्यताप्राप्त सदस्य आहे. तसेच किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र हि राज्य संघटना राष्ट्रीय संघटनेस संलग्नित आहे, आमचे राज्य संघटनेचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी वेळोवेळी शासन दरबारी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे व संबंधित लागणारी सर्व कागदपत्रे क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्या कार्यालयात जमा केली आहेत. व माझ्या कडे सुद्धा त्याच्या प्रति आहेत, मी केव्हाही समोर बसून या संदर्भात वार्तालाप करण्यास तयार आहे. आमच्या मुंबई शहर जिल्हा संघटनेच्या संकेत स्थळावर https://kickboxing.page4.me/ या लिंक वर संपूर्ण माहिती सर्व क्रीडाप्रेमींसाठी उपलब्ध आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com