कोल्हापूर (चंदगड) कै. कृष्णा कुराडे (वय -81) हे मोरेवाडी ता. चंदगड या गावचे होते.
मोरेवाडीतील वारकरी सांप्रदायाचे बीज रुजवण्याच्या कार्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी गेली 40 वर्षे मोरेवाडी ते पंढरपूर अशी पायी वारी करून एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
ते गावाच्या विविध कार्यक्रमात शिमगा, नाटक यामध्ये हौशीने सहभागी होत असत.
आणि त्यांनी मोरेवाडी गावामध्ये पहिली विठूरायाची माळ घातली होती .गावातील ते पहिले बुवा म्हणून ओळखले जात होते. समाजकार्यात त्यांचे सक्रिय योगदान होते. त्यांचा आकस्मित मृत्यूने मोरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सामाजिक क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.