रत्नागिरी : नमन ही पारंपारिक लोककला कोकणातील असून, प्रथमच या कलेला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कोकण नमन कलामंचाची स्थापना झाली. रत्नागिरी तालुक्यातील जवळ जवळ 127 पेक्षा जास्त नमन मंडळे एकत्रित येऊन . या मंडळाची नवीन कार्यकारणी ही पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष -प्रभाकर कांबळे, संस्थापक व कार्याध्यक्ष- श्रीधर कांबळे, उपाध्यक्ष -अरुण कळबटे, सचिव – विश्वनाथ गावडे, सहसचिव – सुरेश होरंबे, खजिनदार -सुरेश येजरे, उपखजिनदार – पांडुरंग होरंबे, संपर्क प्रमुख – श्रीकांत बोंबले, प्रसिद्धप्रमुख – विजय पाडावे, सदस्य -वसंत साळवी, विलास भाताडे, प्रमोद होरंबे, मनोज घवाळी, महादेव कळंबटे
, सचिन तांबे, अमित डांगे, प्रवीण कळंबटे
, संतोष धनावडे, संजय गावडे, सुरेश दसम, हरिश्चन्द्र बंडबे, सुनील लोगडे, दिनेश शितप.
कोकणातील नमन या कलेला तसेच त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना राजाश्रय मिळावा आणि येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही संघटना तत्पर राहील.तसेच तालुक्यातील प्रत्येक पंचक्रोशीत गाठीभेटी घेऊन चर्चा सत्राचे आयोजन करून मंडळाची नमना विषयी असलेली ध्येय- धोरणे स्थानिक कलाकारांनसमोर मांडण्यात आली.