नगर : नुकतीच किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्राची सर्वसाधारण सभा ऑनलाईन मिटिंग द्वारे यशस्वीरित्या पार पडली, यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. निलेश शेलार यांनी आपल्या संबोधनात म्हटले की महाराष्ट्र राज्यासाठी वाको इंडिया यांच्या मार्फत किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र ही संस्था मिळवणे ही प्रत्येक सदस्यासाठी अभिमानाची बाब आहे. शेलार यांनी या मुद्द्यावर म्हटले आहे की किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र ही वर्ल्ड अससोसिएशन किक बॉक्सिंग ओर्गानिझेशन यांच्याशी संलग्न असलेल्या वाको इंडियाची संलग्न असलेली संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. महाराष्ट्रात वाको इंडिया चा कोणत्याही संघटनेची संबंध नाही. श्री. निलेश शेलार यांनी सर्व जिल्हा संघटना सदस्यांना असे म्हटले की सर्व जिल्हा संघटना वेळोवेळी वाको इंडिया ने जारी केलेले नियम परिपत्रके आणि नोटीशन चे शिस्तबद्ध रित्या व काटेकोरपणे पालन करतील आणि किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्राच्या धोरणानुसार पुढील वाटचाल करतील. वाको इंडिया चे अध्यक्ष श्री संतोष अग्रवाल यांचे महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार प्रदर्शन करून त्यांचे धन्यवाद मानले, स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र लवकरच वाको इंडिया चे सर्व स्पर्धांमध्ये व कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवतील तसेच महाराष्ट्रातील सर्व डिस्टिक असोसिएशन किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन च्या सदस्यांना श्री निलेश शेलार यांनी आपापल्या जिल्ह्यात किकबॉक्सिंग चा प्रचार व प्रसार तसेच किकबॉक्सिंग संबंधित कामांना गती देण्याचा सल्ला दिला. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे – अध्यक्ष – श्री निलेश शेलार, उपाध्यक्ष- अनिल मिरकर, सरचिटणीस- धीरज वाघमारे, सहसचिव- विशाल सिंग, कोषाध्यक्ष- नितीन शेलार, याचबरोबर शिस्त समिती, तांत्रिक समिती, जाहिरात समिती, महीला विकास समिती या समितीचे गठन करण्यात आले, या मीटिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते या मीटिंगसाठी अहमदनगर,पुणे शहर व ग्रामीण, पालघर, मुंबई शहर, मुंबई सबरबन, नवी मुंबई, ठाणे शहर व ग्रामीण, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, जळगाव, औरंगाबाद शहर व ग्रामीण, वर्धा, नागपूर शहर व ग्रामीण, वाशिम, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सांगली,गोंदिया, नांदेड शहर व ग्रामीण, भंडारा इत्यादी जिल्हे उपस्थित होते वाकॊ इंडियाचे अध्यक्ष श्री. संतोष अगरवाल यांनी किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या