किक बॉक्सिंग – मुंबई उपनगर स्पर्धा संपन्न

मुंबई: मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशनने या संस्थेने मुंबई उपनगर कॅडेट आणि जूनियर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप १७/१०/२०२१ रोजी यशस्वीरित्या पार पडली . या स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष – विशाल सिंह सर आणि सचिव – प्रशांत कांबळे यांनी केले. उद्घाटन सोहळा – ग्रँड मास्टर प्रदीप मोहिते (महाराष्ट्र पोलीस वरिष्ठ निरीक्षक आणि महाराष्ट्र पोलीस चीफ कोच) आणि मुंबई उपनगर अध्यक्ष विशाल सिंह यांच्या हस्ते पार पडला. या चॅम्पियनशिपमध्ये तबल २३ हुन अधिक संघ आणि जवळपास २२० खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धांचे प्रथम पारितोषिक विजेते मुंबई पोलीस कलिना टिम हे थर्ले, तसेच द्वितीय क्रमांक अझहर किकबॉक्सी टिम व तृतीय क्रमांक विजेता योद्धा फाईट अँड फिटनेस अकादमी हे ठरले. या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंची निवड अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com