शालेय शिक्षण जितके महत्त्वाचे होते तितकेच मुलांना खेळ कौशल्य ही साधना जोपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांचे ई – म्युझिकल २०२१ राज्यस्तर स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खेळाडूंना स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध झाली. स्पर्धा ११ जून ते १२ जून या रोजी होणार आहे. या स्पर्धेमध्ये तीनशे खेळाडू संपूर्ण राज्यातून सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष माननीय श्री निलेश शेलार यांनी केलेला आहे. कोरणा च्यामहामारी मुळे सर्व जिल्हा असोसिएशनचे मार्शल आर्ट्स आणि किक बॉक्सिंग यांचे क्लासेस बंद असल्यामुळे या खेळाडूंची ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र सहित प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक सहित मेडल सुद्धा संस्थेकडून मिळणार आहेत.