एके काळी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या समर्पण आणि चिकाटीने सेवा करण्यात परिचित डॉक्टरांमुळे मुळे महाराष्ट्राची ओळख त्यांच्या नावाने जगभरात आहे. महाराष्ट्राला अश्या बऱ्याचशा सेवाभावी डॉक्टरांची पार्श्वभूमी आहे. पण अलीकडे कोरोना काळात गरजूना हेरून त्यांच्या कडून पैसे कसे मिळतील या उद्देशाने रुग्णालयात ऑक्सिजन ची सोय नसताना हि धाप लागत असलेल्या रुग्णाला दाखल करून घेतल्याची घटना कामोठे मधील एका हॉस्पिटल मध्ये घडल्याचे समोर आले आहे.
काही रुग्नांमध्ये लक्षणे नसतानाही ऍडमिट करून घेतले जाते. त्यांच्या नातेवाईकांना भावनिक दबाव आणत हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जाते व त्यांच्यावर उपचार न करताच दुसरे हॉस्पिटल सुचवले जाते. व विनाकारण अव्वाच्यासव्वा बिल आकारले जाते. अश्याही घटना काही ठिकाणी घडत आहेत. या ठिकाणी काही स्वार्थी डॉक्टरांची हॉस्पिटल व मेडिकल यांच्याशी बांधिलकी असते. स्थानिक डॉक्टर जेव्हा अशा प्रकारचे हॉस्पिटल सुचवतात तेव्हा नागरिकांनी जागरूकतेने तेथील सुविधा उदा. ऑक्सिजन ची सुविधा उपलब्ध आहे की नाही अशा बाबींवर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. काही सुशिक्षित नागरिकही या ठगीकरणाला बळी पडत आहेत, कोविड 19 हॉस्पिटल नसताना आणि ज्या हॉस्पिटल मध्ये ऑक्सीजन ची सुविधा नसतानाही काही डॉक्टर काही टक्यांसाठी व नफ्यासाठी अशी रुग्णालये सुचवून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार कामोठे येथे चालत आहेत. प्रतिनिधी – उमेश मुरकर