शिक्षक भारती मुंबई यांच्या वतीने शनिवार, (ता. 13) फेब्रुवारी रोजी रविंद्रनाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडलेल्या स्नेहसंमेलनात कॊरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योद्धा म्हणून दैनिक सकाळ वृत्त पत्राच्या पत्रकार ‘भारती बारस्कर’ यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) मुंबई विश्वास नांगरे पाटील, प्रमुख अतिथी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारती अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे, शिक्षिका राधिका महांकाळ, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
