भारताची अभेद्य भिंत गोलकीपर सविता पुनिया… भारताला महिला हॉकी मध्ये सुवर्ण पदकाची संधी .

भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनियाने आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर अभेद्य भिंत म्हणून खंबीरपणे उभी राहिली आणि संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारतीय गोलकीपर सविता पुनियाने चेंडूला गोल पोस्टपासून दूर ठेवले. ऑस्ट्रेलियन संघाने अनेक वेळा आपली रणनीती बदलली. भारतीय संघाला फसवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते गोलकीपरच्या पलीकडे जाऊ शकली नाही. सविता पुनिया विरोधी संघासमोर भिंत म्हणून उभी राहिली होती. सविता पुनियाने ऑस्ट्रेलियाचे ७ पेनल्टी कॉर्नर रोखले आणि विरोधी संघ एकही गोल करू शकला नाही. शेवटच्या मिनिटालाही ऑस्ट्रेलियाला पेनल्टी मिळाला पण सविताने तोही अपयशी ठरवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आजच्या विजयात सविताचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुकहोत आहे. सविता पुनिया ही भारतीय महिला हॉकी संघाची उपकर्णधार आहे.
भारताच्या महिला हॉकी ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत एकदाही प्रवेश केलेला नव्हता. भारताच्या महिला हॉकी संघाने १९८० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी स्पर्धेत सहा संघ होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ असून पहिला गोल झाल्यावर काही वेळातच भारतीय संघाला मोठा मोनिका मलिकला यावेळी ग्रीन त्यामुळे तिला मैदानातून बाहेर जावे लागले आणि भारतीय संघावर १० खेळाडूंनिशी खेळण्याची पाळी आली. पण त्यानंतरही सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली. म पुढील ३० मिनिटांच्या खेळावर भारतीय संघ इतिहास घडविणार की नाही, हे अवलंबून होते. ही ऑस्ट्रेलियाने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण यावेळी भारताचा बचाव उत्तम झाला. त्यामुळे तिसऱ्या सत्रानंतरही ने भारताने आपली १-० अशी आघाडी कायम ठेवली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com