किक बॉक्सिंग खेळ व बीच सॉकरचा युरोपियन गेम्सच्या क्रीडा कार्यक्रमात समावेश करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. नुकतेच किक बॉक्सिंग या खेळाला पूर्ण ऑलिम्पिक दर्जा प्राप्त झाला आहे, किक बॉक्सिंग खेळ हा रोमांचक, आधुनिक खेळ आहे, जो आधीच आशियाई खेळ,आफ्रिकन खेळ, जागतिक खेळ आणि मार्शल आर्ट चा भाग आहे, त्यामुळे पुढचे पाऊल म्हणून हा खेळ युरोपियन खेळांमध्ये समावेश करणे अपेक्षित होते .वर्ल्ड असोसिएशन ऑफ किकबॉक्सिंगऑर्गनायझेशन्स चे अध्यक्ष रॉय बेकर (IRL) म्हणाले की “युरोपियन गेम्स 2023 च्या अधिकृतकार्यक्रमात किकबॉक्सिंग खेळाचासमावेश केल्याबद्दल मला आनंदझाला आहे. आमचा समावेश शक्य करण्यासाठीमी ईओसी आणि स्थानिक आयोजनसमित्यांचे मनापासून आभार व्यक्तकरू इच्छितो”.