सायन लक्ष्मीबाग येथे रस्ते दुरुस्ती कामाचा शुभारंभ, शिवसेनेचे नगरसेवक, प्रभगसामिती अध्यक्ष टी एम जगधिश यांच्या उपस्थितीत विभागाची पाहणी

चांगली राहणीमान जसे आवश्यक असते, तसेच चांगले रस्ते असणेही आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर काम करताना गेल्या महिन्याभरात लक्ष्मीबाग परिसराची पाहणी जातीने लक्ष घालून प्रभाग समिती अध्यक्ष टी. एम. जगधिश यांनी केली होती. व या सर्व घडामोडीचा मार्ग मार्गस्थ होऊन रस्ते नूतनीकरणाचे कामाचा आज लक्ष्मीबागेत शुभारंभ म्युनिसिपल चाळ या परिसरातील महिला व नागरिक व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून केला गेला.विशेष म्हणजे प्रभाग समिती अध्यक्षांनी काम चांगले झाले पाहिजे. कामात कोणतीही कमतरता चलवून घेणार नाहीत अशा सूचना कॉन्ट्रॅक्टर यांना केल्या. या वेळी शिवसेनेचे नगरसेवक तसेच प्रभाग समिती अध्यक्ष (जी उत्तर) श्री टी एम जगदीश, शाखाप्रमुख श्री सुरेश जाधव, उपशाखाप्रमुख श्री विजय गणपती शिरसेकर, मनीष कुंचिकोरवे तसेच स्थानिक नागरिक सुर्वे, राणे, निकम, उजाळे, पटवर्धन, मुरकर, असे अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी – उमेश मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com