सौ. उजाळे श्रद्धा उदय यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल व जनसेवेच्या गौरवार्थ बृहन्मुंबई महानगरपालिका तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल व जनसेवेच्या गौरवार्थ बृहन्मुंबई महानगरपालिका तर्फे दिला जाणारा २०१९-२० या वर्षाचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार चेंबूर वेल्फेअर असोसिएशन संचलित चेंबूर वेल्फेअर मराठी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. उजाळे श्रद्धा उदय यांना प्रदान करण्यात आला. त्या अत्यंत कष्टाळू, प्रमाणिक, निष्ठावान, संयमी, व दृढनिश्चयी आहेत. त्या गेल्या १६ वर्षांपासून खाजगी विनाअनुदानित शाळेत मनोभावे सेवा करीत आहेत. त्यांचे शैक्षणिक ज्ञान, विद्यार्थ्याबद्दल असणारी रुची तसेच पालकांशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या याच उत्तम व आदर्श गुणांचा विचार करून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांच्यावर चेंबूर परिसरात पालकवर्गाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com