मुंबई : हिमाचल प्रदेश वुशू असोसिएशन आणि वुशू असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे २२ व्या राष्ट्रीय
सब-ज्युनियर वुशु चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेचे आयोजन ९ जुलै ते १४ जुलै २०२२ या कालावधीत पॅडल स्पोर्ट्स स्टेडियम, जि. मंडी, हिमाचल प्रदेश येथे झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना हृषीत शेट्टी याने कांस्य पदक पटकावत आपली चमक दाखविली. हृषीतचे मुंबईत सर्व स्तरावर कौतुक होत आहे. प्रशिक्षक विशाल सिंह यांचे मार्गदर्शन हृषीत शेट्टी ला लाभत आहे.