कामाठीपुरात आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे हॅपिनेस प्रोग्राम

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कामठी पुऱ्यातील सेक्स वर्कर यांच्याकरिता नुकताच तीन दिवसांचा हॅपिनेस प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. कोविड -१९ मध्ये या महिलांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता त्या आपले पोट भरण्यासाठी व त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अवघ्या ५० ,१०० रुपयांमध्ये कस्टमर घेत होते, यामुळे त्यांच्या मनावर ताण आला होता, याची दखल घेता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून या परिस्थितीत सोशल डिस्टंनसिंगचे नियम पाळून त्यांना विरंगुळा म्हणून शिबिर घेण्यात आले. शिबिरात स्वतःच्या आरोग्यासाठी लाभदायक योगा प्राणायाम आणि ध्यान शिकविण्यात आले . शिबिराच्या शेवटच्या दिवशी त्या सर्व महिलांना धान्याचे पॅकेट्स ( ५ किलो गव्हाचे पीठ,५ किलो तांदूळ, २ किलो चण्याची डाळ,१ किलो साखर, मीठ ,तेल ) देण्यात आले या पॅकेट्सचा लाभ त्या कमीतकमी २५ दिवस घेऊ शकतात. समाजसेविका पार्वती खांदुरी जी यांनी त्या शिबिराचा पुढाकार घेतला होता. त्यांनी आम्हाला हे शिबिर घेण्यासाठी प्रोत्साहित केले. २०० सेक्स वर्कर महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिरार्थी महिलांच्या मधील ‘आखी अशप्त अंसारी ‘ या महिलेने, मला या शिबिरात मागील तीन दिवसांपासून खूप चांगला व आनंदी अनुभव आला, मनाला प्रसन्नता मिळाली,मला अशी कधी संधी मिळाली नव्हती जी या शिबिरात सहभागी होऊन मिळाली, मनावर कोणतंच दडपण व ताण आला नाही. मला या शिबिरात सुदर्शन क्रिया केल्यामुळे मनाला शांतता मिळाली खूप आनंद झाला. या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच ‘रियाना अंसारी’ हीने मला या शिबिरात मागील तीन दिवसांपासून खूप चांगला व आनंदी अनुभव आला, मनाला प्रसन्नता मिळाली,मला अशी कधी संधी मिळाली नव्हती जी या शिबिरात सहभागी होऊन मिळाली, मनावर कोणतंच दडपण व ताण आला नाही. मला या शिबिरात सुदर्शन क्रिया केल्यामुळे मनाला शांतता मिळाली खूप आनंद झाला. अशी प्रतिक्रिया दिली.
सर्व महिलांनी स्वतःला असे आवाहन केले की गुरूदेवांच्या आवाजातील सुदर्शन क्रिया महिन्यातून दोनदा रेश्मा दीदी सोबत नित्य नियमाने करू आणि तुम्हाला आमच्यातला बदल काही दिवसात दिसेल तरी आमची गुरूदेवांना अशी विनंती आहे की आम्हाला काही रोजगार उभे करून द्यावे जेणेकरून आमचे पोट भरेल व आमचे जीवन बदलून जाईल. महिलांनी आपल्या चुकीच्या कार्यातून बाहेर येण्याचा संकल्प घेतला. त्यांनी ह्या कामातून बाहेर येऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन घेतले. त्यांना प्रेरित करण्याकरिता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक रेश्मा मारुती परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी ( दीपा नायर , लक्ष्मी आनंदकुमार , सुनिता पिल्ले , विद्या पवार , अनिता तुंगल , प्रमोद काठे. )सहकार्य करून सामाजिक कार्याला हातभार लावला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com