१२व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ

मुंबई : यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे झाले. यावेळी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, यशवंत चित्रपट महोत्सवाचे मार्गदर्शक व समन्वयक डॉ. जब्बार पटेल व्यासपीठावर उपस्थित होते. यंदाचा महोत्सव गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतींना समर्पित केलेला आहे.
यावेळी महोत्सवाचे मुख्य समन्वयक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगीतले चित्रपट महोत्सवाला जगभरातून अतिशय भरगच्च प्रतिसाद मिळाला असून २०० निवडक चित्रपटांतून अंतिमतः ४० उत्तम चित्रपट आम्ही यंदाच्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी निवडले आहेत. या महोत्सवात फ्रेंच, इंडोनेशियन, रशियन आणि जर्मन असे ३० आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि पाच भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत अशी माहिती दिली.
महोत्सवा बद्दल अधिक माहितीसाठी https://yiffonline.com वर संपर्क साधवा.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com