गोवा : वाको इंडिया सीनिअर अँड मास्टर नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेचे भव्य उद्घाटन. आज गोवा म्हापसा येथे मल्टिपर्पज इनडोअर स्टेडियम दयानंद बांदोडकर क्रीडा संकुल, पजीम गोवा येथे झाले. वाको इंडिया किक बॉक्सिंग नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांनी खेळाडूंना संबोधताना किक बॉक्सिंग या खेळाला भारतात खूप वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्याचा संकल्प घेतला. भारतातून २३ राज्यांचा सहभाग
व त्या राज्यांच्या अध्यक्षांनी खेळाडूंना प्रोत्साहित करून त्यांच्या भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.