पटना : इब्राहिम मंजिल, कुन कुन सिंह लेन, केदार अपार्टमेंटस्, पटना येथे 1 फेब्रुवारी 2021 रोजी एशियन फिट आणि फाइट क्लबचा भव्य उदघाटन समारंभ पार पडला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद शम्स आलम शेख – (आंतरराष्ट्रीय पॅरा स्विमर अँड ब्लॅक बेल्ट शितो रिय कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन ) यांनी रिबीन कापून उदघाटन केले. तसेच सूरज कुमार (कोषाध्यक्ष बिहार कराटे युनियन) आणि पंकज कांबळी (सरचिटणीस बिहार कराटे युनियन) यांचीही प्रमुख उपस्थिती होती. शम्स आलम, पंकज कांबळी आणि सूरज कुमार यांनी सादर केलेल्या रिबन कटिंग सोहळ्यानंतर झाबीर अन्सारी यांनी प्रेक्षकांना काही कराटे तंत्र दाखवले.
श्री.शम्स आलम यांनी खेळाडूंना व पालकवर्गाला संबोधन करताना म्हणाले कि या वर्गात उत्तम प्रशिक्षण उपकरणे व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा योग्य उपयोग करून नवोदित कराटेका देशाचे नाव निश्चितच उज्वल करतील. कराटे प्रशिक्षक: मोहम्मद अहतेशम अख्तर यांनी शम्स शेख यांनी दिलेल्या विशेष उपस्थिती बद्दल आभार मनात कार्यक्रमाचा समारोप केला.