मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून नियोजन केलं आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी फक्त प्रशासनाने परवानगी दिलेल्या पालख्याच पंढरपुरात बसने दाखल होतील.
आज सर्व संताच्या दिंड्या पायीवारी साठी पंढरपूरला मार्गस्थ होतात. करोना च्या महामारी मुळे याही वर्षी वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येत नाही. हे अवचित्य साधुन ठाणे येथे ‘वारकरी भवन,’ येथे आज पासुन आषाढी एकादशी पर्यंत दिडींतील सर्व कार्यक्रम वारकरी भवनात होणार आहेत. खासदार श्री.राजन विचारे याच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ,श्री.दिनकर महाराज पांचगे, ह.भ.प.किशोर महाराज यानी कार्यक्रमाचे नियोजन केले. आजचे प्रमुख किर्तनकार ह.भ.प. श्री.संतोष बिडकर महाराज(सामाजिक परिवर्तन वारकरी प्रतिष्ठान संस्थापक, अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत भजन.प्रवचन,हरीपाठ, व कार्यक्रमाची सांगता झाली. ठाण्यातील वारकरी संघटनेनी या कार्यक्रमात भाग घेतला.