धारावीत तिरुमला क्लिनिक मध्ये विनामूल्य लिव्हर फायब्रोस्कॅन मेडिकल कॅम्प संपन्न

आज दिनांक २१ डिसेंबर रोजी मुकुंदनगर, धारावी येथे लिव्हर फायब्रोस्कॅन मेडिकल कॅम्प घेण्यात आला, लिव्हर संबंधित आजारावर ते वेळीच जाणून त्यावर उपचार करण्याकरता अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन डॉ.अंजली वाघमारे. डॉ. अरविंद वाघमारे, डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या तिरुमला क्लिनिक मध्ये आयोजित करण्यात आला होता, या शिबिराचा लाभ सोशल डिस्टन्स, मास्क व नियमाचे पालन करून २०० रुग्णांनी घेतला. लिव्हर ( यकृत ) च्या संबंधित विविध आजारांचे आजारांची उदा. हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, क्रोनिक अल्कोहोल अशा विविध आजार असलेल्या रुग्णांना या विनामूल्य उपक्रमाचा चांगलाच फायदा झाला व त्याचबरोबर औषधे मोफत देण्यात आली. सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन श्री. मनीष चौधरी (मनीष मेडिकल) यांनी या सर्व शिबिर आयोजन करण्यात मोलाचे योगदान दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com