मुंबई : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर व गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट, शितो रियू स्पोर्ट कराटे किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त माध्यमातून विनामूल्य कराटे व किकबॉक्सींग प्रशिक्षण शिबिर, मनोरंजन पार्क, लालबाग येथे आयोजित केले होते. दिनांक १२ ते १८ एप्रिल या दरम्यान सकाळी सात ते नऊ या वेळेत दररोज मले व मुली यांना प्रशिक्षित करून हे शिबीर अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केले गेले, सदर शिबिराचा उद्देश अधिकाधिक विद्यार्थी या क्रीडा प्रकारा कडे वळतील व त्यांना अशा रितीने मुलांमध्ये या क्रीडा प्रकाराची आवड निर्माण होईल हा होता. सदर शिबिराची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने एस एस के के ए संस्थेच्या संकेत स्थळावर प्रसारित केली होती. याला प्रतिसाद देत ६७ जणांनी नाव नोंदणी केली व प्रशिक्षणात आपला सक्रिय सहभाग नोंदविला. प्रशिक्षक उमेश ग मुरकर, सनिकेत साळसकर व विघ्नेश मुरकर यांनी विद्यार्थ्यांना कराटे व किक बॉक्सिंग या कलेचे प्रशिक्षण दिले, अभय चव्हाण – जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनीही मुलांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
