मुंबई : श्री शिवनेरी रहिवाशी संघ धारावी येथे भारतीय जैन संघटना – कम टुगेदर फाऊंडेशन यांच्या वतीने मेडिकल हेल्थ चेकअप व मोफत आरोग्य शिबीर व कोविड लसीकरण रजिस्ट्रेशन कॅम्प रविवार दि. २५/०४/२०२१ रोजी सकाळी १०.०० ते ४.०० वा. शिवनेरी मैदानात हे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरासाठी डॉ सुफियान अन्सारी, डॉ शाहजादी एस व यांच्या टीम ने नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे काम पाहिले, परिसरातील नागरिकांनी सोशल डीस्टस चे पालन करीत या आयोजनाला सक्रिय प्रतिसाद दिला. या कॅम्प मध्ये नागरीकांना मोफत औषधे देखील दिली गेली. स्थानिक समाजसेवक – श्री बाळा मुरगन तसेच यांचे सहकारी श्री. साजन सरकले, श्री श्याम पोस्तुरे, श्री प्रमोद द्विवेदी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल श्री. संतोष शेडगे- अध्यक्ष श्री शिवनेरी रहिवाशी संघ, यांनी आभार प्रदर्शन केले
2 thoughts on “कम टुगेदर फाउंडेशन च्या वतिने धारावीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न”
Comments are closed.
Appreciated❤️
thank you