मुंबई : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यायत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्टस इंन्स्टयूटयूटचे यांचे संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे येथील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्याचा चाचण्यांचे जिल्हास्तरीय आयोजन खालील प्रमाणे करण्यात आले आहे. खेळ – डायव्हिंग, मैदानी, कुस्ती, वेटलिफ्टींग, बॉक्सींग, तलवारबाजी, डायवलनि, आर्चरी
सहभागी होणा-या खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिनांक७ -१०.२०२१ पर्यंत करणे अनिवार्य आहे.
मुंबई शहर जिल्हावातील जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री अभय चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी केलेले आहे. अधिक माहिती साठी जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर येथे संपर्क साधावा